logo
Back

NEET 2025 परीक्षा पद्धतीत मोठे बदल

Home / NEET 2025 परीक्षा पद्धतीत मोठे बदल


blog

NEET 2025 परीक्षा पद्धतीत मोठे बदल


तुम्हीही या वर्षी NEET ची परीक्षा देत असाल, तर ही महत्वपूर्ण अपडेट तुमच्या साठीच आहे. 

NEET 2025 परीक्षेमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. यात NEET-PG, NEET-MDS, NEET-SS, FMGE, DNB-PDCET, GPAT, DPEE, FDST या परीक्षांचा समावेश आहे.  

या परीक्षा पद्धतीमध्ये पाहिला बदल करण्यात येणार आहे तो म्हणजे  

ही परीक्षा दोन भागांमध्ये असणार आहे. 

 भाग A आणि भाग B.  भाग A मध्ये 100 प्रश्न असतील जे 75 मिनिटांत पूर्ण करायचे आहेत, तर भाग B मध्ये 140 प्रश्न असतील ज्यासाठी तुम्हाला 105 मिनिटे वेळ असेल. 

याशिवाय एका भाग ची वेळ संपल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या भागाचे प्रश्न पुन्हा सोडवू शकणार नाहीत किंवा त्यांची उत्तरेही तुम्हाला पाहता येणार नाही. 

या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन परीक्षा पद्धतीची तयारी व्हावी यासाठी ते डेमो चाचणी पण देऊ शकतात.

यानंतरचा दूसरा बदललेला नियम म्हणजे, तुम्हाला 

परीक्षेच्या किमान 30 दिवसआधी पर्यंतच एक्झॅम सेंटर ठरवावे लागणार आहे. 

या नंतर तुम्हाला तुमचे परीक्षा केंद्र बदलता येणार नाही.  

यानंतरचा बदल आहे, तो म्हणजे २०२४ पर्यंत असलेल्या 

NEET UG च्या सेक्शन B मधील पर्यायी प्रश्न आता बंद

 करण्यात येणार आहेत.

यानंतर, डॉक्युमेंट विषयी एक महत्वाची अपडेट अशी की, विद्यार्थ्यांना आता १ जानेवारी २०२५ नंतर काढलेला अलीकडील पासपोर्ट साईज फोटो,

 त्यांची साइन, बोटांचे ठसे आणि संबंधित प्रमाणपत्रे जसे की दहावीच्या मार्कशीट किंवा इतर प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.