सीयूईटी-यूजी २०२५ परीक्षेत मोठे बदल झाले आहेत. या परीक्षेसाठी आता फक्त ३७ विषयच उपलब्ध असतील! देशातील सर्व विद्यापीठांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, अर्थात NTA ने सीयूईटी-यूजी २०२५ परीक्षेसाठी असलेल्या विषयांची संख्या ६३ वरून ३७ इतकी कमी केली आहे. यामध्ये भाषा आणि विशिष्ट विषयांच्या संख्येत घट झाली आहे.
ही परीक्षा ८ मे ते १ जून २०२५ दरम्यान होणार आहे. देशभरातील *२८५ शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. विशेष म्हणजे, २६० हून अधिक विद्यापीठांमध्ये या परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहील. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा असे आवाहन केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थापन केलेल्या, तज्ज्ञ समितीने काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. यामध्ये -
✅ भाषा विषय: आधी ३३ भाषा होत्या, आता फक्त १३ भाषा असतील.
✅ विशिष्ट विषय: आधी २९ होते, आता ती संख्या २३ पर्यंत खाली आणली आहे.
✅ सामान्य अभियोग्यता चाचणी (General Aptitude Test)याचा समावेश केला आहे.
✅ कमी केलेले विषय: यातील प्रवेश आता सामान्य पात्रता परीक्षेच्या गुणांवर आधारित असेल.
या बदलांमुळे परीक्षेचे स्वरूप अधिक केंद्रित होईल आणि प्रवेश प्रक्रियेतही बदल दिसून येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या परीक्षा पद्धतीची माहिती व्यवस्थित घेऊन तयारी करणे महत्त्वाचे आहे.
तर, सीयूईटी-यूजी २०२५ परीक्षेसाठी त्वरीत अर्ज करा!