दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता अंतिम टप्यात असताना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी) आजपासून सुरु होत आहेत.
तब्बल १९ अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ३ मेपर्यंत या परीक्षा चालणार आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र, एमबीए, एमसीए, बी.एड. विधी अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येतात.
गुरुवारी होत असलेल्या एम.एड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला २५ डिसेंबरपासून सुरूवात करण्यात आली होती.
एम.एड या अभ्यासक्रमासाठी ३ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी तर एम.पी.एड या अभ्यासक्रमासाठी २ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज भरले असून हे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
१९ विविध अभ्यासक्रमांपैकी केवळ बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया शिल्लक असून, विधी तीन वर्षे व पाच वर्षे अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
उर्वरित सर्व अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यभरातून तब्बल १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षासाठी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.
दिनांक ● १९ मार्च ● १९ मार्च ● २३ मार्च ● २४ मार्च ● २७ मार्च ● २७ मार्च ● २८ मार्च • २८ मार्च • २९ मार्च • १ एप्रिल • ५ एप्रिल • ७ एप्रिल ● ८ एप्रिल • ९ एप्रिल • १९ एप्रिल • २८ एप्रिल • २९ एप्रिल ३ मे | सीईटी एम.एड एम.पी.एड एमसीए बी.एड एम.एचएमसीटी बी.पी.एड बी.एचएमसीटी बी.एड -एम.एड बी. डिझाईन एमबीए/एमएमएस फाईन आर्ट नर्सिंग डीपीएन/पीएचएन एमएचटी सीईटी (पीसीबी) एमएचटी सीईटी (पीसीएम) विधी तीन वर्षे बीसीए, बीबीए विधी तीन वर्षे |
विद्यार्थी ३८०९ २३८४ ५६२५७ ११६५८५ ८० ६५९८ १४३६ ११३९ १३२८ १५७२८१ २७८९ ४७४९७ ४७७ ३०१०७२ ४६४२६३ ३३१३३ ५८३८४ ८७९३७
|