केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षा आजपासून म्हणजेच १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी दहावीचे विद्यार्थी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत इंग्रजी (कम्युनिकेटिव्ह) आणि इंग्रजी (भाषा व साहित्य) पेपरला बसणार आहेत. बारावीचे विद्यार्थी याच शिफ्टमध्ये एंटरप्रिन्योरशिपचा पेपर देणार आहेत
सीबीएसई इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा संगम पोर्टलवर स्कूल लॉगिनद्वारे जारी करण्यात आले आहे. यावर्षी सीबीएसईला दहावी आणि बारावीच्या परीक्षेला देश-विदेशातील आठ हजार शाळांमधील सुमारे ४४ लाख विद्यार्थी बसण्याची अपेक्षा आहे.
बोर्डाने परीक्षेविषयी एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यात ड्रेस कोड, परीक्षा हॉलमध्ये परवानगी आणि बंदी असलेल्या वस्तू, अनुचित माध्यम पद्धती (यूएफएम) आणि दंड यांचा उल्लेख आहे.
सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२५: महत्त्वाची माहिती
१. Admit card वरती दिलेली माहिती वाचा आणि ती लक्षात ठेवा.
२. प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सूचना वाचा.
३. नियमित विद्यार्थ्यांनी शाळेच्या ओळखपत्रासह प्रवेशपत्र आणणे आवश्यक आहे. बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र आणि शासनाने जारी केलेला फोटो ओळखपत्र सोबत आणावे लागणार आहे.
सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२५: हॉलमध्ये कोणत्या वस्तूंना परवानगी?
१) परीक्षा हॉलमध्ये पारदर्शक पाऊच, भूमिती/पेन्सिल बॉक्स, निळा/रॉयल ब्लू शाई बॉलपॉईंट/जेल पेन, स्केल, रायटिंग पेंड, इरेजर, अॅनालॉग वॉच, पारदर्शक पाण्याची बाटली, मेट्रो कार्ड, बस पास आणि पैसे आदी वस्तूंना परवानगी देण्यात आली आहे
२) पाठ्यपुस्तक (मुद्रित किंवा लेखी), कागदाचे तुकडे, कॅल्क्युलेटर, पेन ड्राइव्ह, लॉग टेबल (केंद्रांद्वारे प्रदान केले जाईल), इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर इत्यादी स्टेशनरी वस्तूंना परवानगी नाही. डिस्कॅल्क्युलिया असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राने प्रदान केलेले कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे.
३) मोबाइल फोन, ब्लूटूथ, इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, स्मार्ट वॉच, कॅमेरा आदी साधनांना परवानगी नाही.
४) पाकीट, गॉगल्स, हँडबॅग, पाऊच आदींना परवानगी नाही.
५) ड्रेस कोड: नियमित विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश परिधान करावा, तर बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हलके कपडे घालता येतील.
तर तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. All the best..