यावर्षी लॉ ला अॅडमिशन घेण्यासाठी CET देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास 80,500 इतकी आहे.
या सर्वांची cet परीक्षा ही 20 आणि 21 मार्चला होणार होती, मात्र त्याच दिवशी मुंबई विद्यापीठाच्या काही महत्वपूर्ण परीक्षा आहेत.
ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी cet सेलला ही गोष्ट कळवली आणि तारीख बदलण्याची विनंती विद्यार्थ्यांनी केली होती.
या वर action घेत cet सेलने या परीक्षेची तारीख पुन्हा एकदा बदललेली असून, आता नव्याने 3 आणि 4 मे ही तारीख देण्यात आली आहे.
या वाढलेल्या वेळेचा फायदा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होईल आणि त्यांना अधिक चांगला अभ्यास देखील करता येईल हे मात्र नक्की आहे.