बारावीचा रिजल्ट 15 मे पर्यंत लागणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.
12 वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ला सुरू होत आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे यावर्षी बारावीची परीक्षा दरवर्षी पेक्षा 10 ते 15 दिवस लवकर सुरू होत आहे.
परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना टेंशन असतं ते रिजल्टचं, प्रत्येकवर्षी रिजल्टच्या तारखा या बदलत असतात पण यावर्षी बारावीचा रिजल्ट 15 मे पर्यंत लागणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.