Through State Common Entrance Test म्हणजेच सीईटी सेल द्वारे Medical आणि Engineering अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा पीसीबी आणि पीसीएम या दोन गटांमध्ये होते. पीसीबी म्हणजे Physics- Chemistry- Biology गटाची परीक्षा वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असते, तर पीसीएम म्हणजेच Physics-Chemistry-Mathematics गटाची परीक्षा Engineering अभ्यासक्रमासाठी गरजेची आहे. यंदा पीसीबी गटाची सीईटी परीक्षा ९ एप्रिलला होणार असून, पीसीएम गटाची परीक्षा १९ एप्रिलला होईल.
Medical आणि Engineering अभ्यासक्रमांसाठी ( Maharashtra Health and Technical Common Entrance Test) राज्यातील संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी यंदा सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल पावणे दोन लाखांनी जास्त आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.
गेल्या वर्षी एमएचटी-सीईटीसाठी सात लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सह लाख ८५ हजार जणांनी प्रत्यक्ष शुल्क भरत नोंदणी निश्चित केली. यंदा हा आकडा तब्बल पावणे दोन लाखांनी वाढला आहे. यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 8 लाख 94 हजार 734 एवढी आहे. त्यापैकी सात लाख ६४ हजार ३६८ जणांनी शुल्क भरून आपली नोंदणी निश्चित केली आहे. यात पीसीबी गटातील तीन लाख ६३ आणि पीसीएम गटातील 4 लाख 63 हजार 765 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.