logo
Back

असा करा 12 वी परीक्षेचा अभ्यास !

Home / असा करा 12 वी परीक्षेचा अभ्यास !


blog

असा करा 12 वी परीक्षेचा अभ्यास !


12 वी बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान आहेत. आता विद्यार्थ्यांची रिव्हिजन सुरू झाली असेल. त्यासाठी अभ्यासाच्यादृष्टीने या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाच्या ठरतील अशा काही महत्वाच्या टीप्स या आहेत... 

सकाळचे रिव्हिजन टाइमटेबल – 

सकाळी वाचलेल्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात आणि म्हणूनच प्रत्येक विषयाचे सकाळचे रिव्हिजन टाइमटेबल तयार करा, त्यामुळे एकाग्रतेने अभ्यास करू शकाल. 

नोट्स बनवणे – 

काही विषयांसाठी तारखा, तसेच फॉर्म्युला, लक्षात ठेवायला लागतात, ते नीट लक्षात राहावेत म्हणून ते एका ठिकाणी लिहून काढा. 

तसेच जे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत त्याच्या नोट्स बनवा. त्यामुळे महत्वाचे मुद्दे लक्षात राहायला मदत होईल. 

NCERT -

NCERT बोर्डाच्या पुस्तकांवर जास्त भर द्या कारण त्याच पुस्तकांचा सर्वात जास्त उपयोग होणार आहे. 

ऑनलाइन टेस्टस् – 

रिव्हिजनसाठी ऑनलाइन टेस्ट द्या, त्यामुळे कोणती कन्सेप्ट समजली आहे व कोणती नाही हे कळेल, 

तसेच कोणत्या विषयाचा अभ्यास कमी पडत आहे या सर्व गोष्टींचा अंदाज येईल. 

लिखाणाचा स्पीड वाढवा – 

बरेचदा आपल्याला उत्तर माहीत असतं पण लिखाणासाठी वेळ कमी पडतो आणि म्हणूनच वेळ लावून पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा त्यामुळे तुमचा लिखाणाचा स्पीड वाढेल. 

Group Discussion – 

मित्रांसोबत Group discussion करा त्यामुळे अभ्यास इंट्रेस्टिंग वाटेल आणि Group discussion करताना माहीत नसलेले काही पॉईंट्स देखील कळतील.

व्हिडिओ अँड ऑडिओ लेक्चरस् –

जर वाचून काही गोष्टी लक्षात राहात नसतील तर त्या टॉपिक्ससाठी व्हिडिओ किंवा ऑडिओ लेक्चर्सचा देखील वापर करू शकता. 

Flow Charts and Diagrams –

काही अवघड विषय लक्षात ठेवण्यासाठी Flow charts किंवा diagrams चा वापर करू शकता, त्यामुळे ते विषय समजून घेणे सोपे जाईल.