logo
Back

जर शिक्षण घ्यायची इच्छा आणि ध्यास असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही.

Home / जर शिक्षण घ्यायची इच्छा आणि ध्यास असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही.


blog

जर शिक्षण घ्यायची इच्छा आणि ध्यास असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही.


बरेच पालक आपल्या मुलांना सतत म्हणत असतात, नाचू नकोस, खेळू नकोस, अॅक्टिंग वगरे मध्ये पडू नकोस. पण तुम्हाला माहिती आहे का अशी बरीच उदाहरण आहेत ज्यांनी आपली आवड, कला जपत आपल शिक्षण पूर्ण केलं आणि दोन्हींची एकत्र सांगड घालून ते यशाच्या उंच शिखरावर आहेत. आज अशीच एक प्रेरणादायी स्टोरी आपण पाहणार आहोत. ती म्हणजे अभिनेत्री श्रीलीलाची... 

सगळ्यांची आवडती अभिनेत्री श्रीलीलाला तर आपण सगळेच ओळखतो, आणि तिच्या अमेझिंग डान्स मूव्हस् चे तर सगळेच fan आहेत. पण तिच्या शिक्षणाची अमेझिंग स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

श्रीलीलाचा जन्म 14 जून 2001 ला अमेरिकेत झाला, पण ती बेंगलूरु मध्ये लहानाची मोठी झाली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने एमबीबीएसचा अभ्यास सुरू केला, 

डॉक्टर होणे तिचे स्वप्न होते. तिने 2021 मध्ये एमबीबीएस पूर्णही केले. श्रीलाला डान्सची आवडत होती, तिने भरतनाट्यम नृत्याचे देखील प्रशिक्षण घेतले. शाळेत असल्यापासून ती स्टेज परफॉर्मन्स देत असे. 

तिने अभिनयाच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत तिचं एमबीबीएसचं शिक्षण देखील पूर्ण केलं. आणि हे सिद्ध केलं की जर ठरवलं तर शिक्षण आणि आपली आवड, कला यांची उत्तम सांगड घालता येते. तिला कीस movie मधून डेब्यू करण्याची संधी मिळाली तेव्हा ती अभ्यास आणि शूटिंग असे दोन्ही उत्तम रित्या सांभाळत असे. तिला या मूवीसाठी स्त्री- कन्नड SIIMA हा अवॉर्ड मिळाला. 

त्यानंतर तिला पेल्ली सांडा या movie साठी Best Debut Actress चा अवॉर्ड तर धमाका या movie साठी बेस्ट तेलुगू अॅक्ट्रेस हा अवॉर्ड मिळाला. तिने तिच्या करियरमध्ये आतापर्यंत 11- 12 movies मध्ये काम केलं आहे. तिला महेश बाबूसोबतच्या गुंटूर करम ह्या मूवीमधून खूप प्रसिद्धी मिळाली.

 तिने अभिनय आणि शिक्षण अश्या दोन्ही गोष्टी सांभाळून हे सिद्ध केलं की जर शिक्षण घ्यायची इच्छा आणि ध्यास असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही.