तुम्ही आता बारावीला आहात का ? आणि या पुढे तुम्हाला इंजिनियरिंग करायचं आहे का ? तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे..
बरेचदा इंजिनियरिंग करायच हे फिक्स असत पण कोणती ब्रांच निवडायची हे ठरलेल नसतं. कधी ब्रांचची माहितीही नसते आणि कधी कधी तुम्हाला जी ब्रांच हवी आहे तिथे अॅडमिशन मिळत नाही मग कोणत्या ब्रांचला अॅडमिशन घ्यायचं ? असे प्रश्न तुम्हाला देखील पडलेत का ? तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात....
तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत ह्या ब्रांचेस-
पहिली ब्रांच आहे-
Aeronautical Engineering –
Aeronautical Engineering हे एक असे क्षेत्र आहे ज्यात विमान किंवा हवाई वाहतुकीशी निगडीत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा अभ्यास केला जातो. तसेच helicopters, planes आणि drones यांच्या designing, developing आणि टेस्टिंगचा अभ्यास देखील Aeronautical Engineering मध्ये करता येतो.
Automobile Engineering –
बस, स्कूटर, कार अशी सर्व वाहने बनवण्याची प्रक्रिया तसेच त्यांचे डिजायनिंग, टेस्टिंग, सर्व्हिसिंग या सगळ्याचा अभ्यास Automobile Engineering मध्ये केला जातो.
Civil Engineering –
इमारती, पूल, रस्ते, रेल्वे, इरिगेशन, डॅम, टॉवर्स यांच्या बांधकामचा अभ्यास Civil Engineering मध्ये केला जातो. सध्या या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर चांगल्या संधी या जगभर उपलब्ध आहेत
Mechanical Engineering –
मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मशिन्स कशी वर्क होते याचे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना दिले जाते, जगाच्या पाठीवर या ब्रांचमधील इंजिनियरला मोठी मागणी आहे.
Electronics and Communication Engineering –
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीयरिंग मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्किट्स, ट्रान्समीटर, रिसीव्हर, इंटिग्रेटेड सर्किट्स (आयसी) यासारख्या साधनांचा उपयोग कसा करावा हे शिकायला मिळते.
Industrial Engineering-
या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस प्रोग्रॅमिंग, इंट्रोडक्शन टू डेटा स्ट्रक्चर्स, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सिस्टम्स, कास्टिंग, फॉर्मिंग आणि वेल्डिंग, इन्व्हेंटरी सिस्टम्सचे व्यवस्थापन आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग असे अनेक विषय या ब्रांचमध्ये शिकवले जातात.
Information Technology-
या शाखेमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक डेटा तयार करणे त्यावर प्रक्रिया करणे आणि तो डेटा सुरक्षित करून त्याची देवाणघेवाण करणे याचा समावेश या माहिती व तंत्रज्ञान (IT) च्या शाखेत होतो.
Instrumentation and Control Engineering -
या अभ्यासक्रमांमध्ये डिजिटल आणि अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रामेबल सिस्टमचे घटक, संगणक आर्किटेक्चरचे introduction, network technology चे introduction, Mechanical principles, Engineering materials, Applied Mathematics आणि Electronic production डिझाइन यांचा समावेश आहे.
केमिकल इंजिनियरिंग-
केमिकल इंजीनियरिंग यामध्ये काही chemicals पासून physical आणि Biological सायन्स चा वापर करून product बनवण्याचा अभ्यास या मध्ये केला जातो.
Mining Engineering-
माइनिंग इंजीनियर म्हणजे खनिजांवर रिसर्च करणे आणि त्यांचे प्रोसेसिंग करणे या विषयावर काम करणण्याची संधी आपल्याला या ब्रांचच्या माध्यमातून मिळते.
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग-
इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग ही एक इंजिनीयरिंग शाखा आहे ज्यामध्ये विद्युत उर्जेची निर्मिती, broadcasting,
Distribution याविषयी अभ्यास केला जातो.
Marine Engineer Ing-
सागरी मार्गाने चालणारी वाहतूक किंवा इतर देशातील सागरी किनारपट्टीशी निगडीत संशोधन व अभ्यास हा मरिन इंजिनीअरिंगमध्ये केला जातो. यासोबतच जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर या क्षेत्राच्या मध्यामातून तुम्हाला भरपूर फिरायला देखील मिळेल.
Nuclear Engineering –
Electrical Engineering आणि Chemical Engineering या दोन्हींचा एकत्रित अभ्यास Nuclear Engineering मध्ये केला जातो, या क्षेत्रात देखील चांगल्या नोकरीच्या संधी आपल्याला पाहायला मिळतात.
Electrical Engineering -
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये छोट्या मायक्रोचिप्सपासून ते पॉवर स्टेशन जनरेटरपर्यंत अनेक उपकरणांवर आणि यंत्रणेवर काम करण्याची संधी आपल्याला मिळते. या ब्रन्चला जगभरातदेखील चांगली संधी आहे.
तर या आहेत सर्व इंजिनियरिंगच्या ब्रांचेस, मग तुम्ही कोणत्या ब्रांचला अॅडमिशन घेणार आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि यातील कोणत्या ब्रांचवर तुम्हाला सविस्तर माहिती हवी आहे ते ही कॅमेंट करा.