logo
Back

COEP मध्ये लवकरच सुरु होणार "या" नवीन ब्रांच

Home / COEP मध्ये लवकरच सुरु होणार "या" नवीन ब्रांच


blog

COEP मध्ये लवकरच सुरु होणार "या" नवीन ब्रांच


The College of Engineering Pune (COEP)  मध्ये Undergraduate साठी नेमक्या कोणकोणत्या स्ट्रीमस आहेत तुम्हाला माहित आहे का?

COEP मध्ये आणखी कोणत्या नवीन ब्रॅंचेस सुरु झाल्या आहेत आणि कोणत्या नविन ब्रॅंचेस सुरु होणार आहेत, याची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे इंजिनिअरिंगला शक्य झालं नसेल तरी या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही COEP मध्ये नक्कीच प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण वाचा.

The College of Engineering Pune (COEP) मध्ये Undergraduate (B.Tech) Program साठी 

Computer Engineering, Information Technology, Mechanical Engineering, Civil Engineering,  Electrical Engineering, Electronics and Telecommunication Engineering, Production Engineering, या स्ट्रीमस आपल्याला माहितीच आहेत...

पण यासोबतच काही नवीन ब्रॅंचेस आहेत 

पहिली ब्रॅंच आहे
Environmental Engineering-  या ब्रॅंचमध्ये पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यामध्ये जलसंपदा, हवेची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, आणि संसाधनांचे संरक्षण यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जातो.

या नंतरची अजून एक नवीन ब्रॅंच आहे ती म्हणजे

Polymer Engineering- ही ब्रॅंच पॉलिमर (प्लास्टिक, रबर, फायबर्स इत्यादी) उत्पादन, प्रक्रिया, आणि वापर यावर आधारित आहे. पॉलिमर अभियांत्रिकीमध्ये पॉलिमर पदार्थांची रचना, त्यांचे गुणधर्म, आणि त्यांची विविध औद्योगिक प्रक्रिया यांचा अभ्यास यामध्ये केला जातो.

Instrumentation and Control Engineering- यात औद्योगिक प्रक्रिया, यंत्रणा, आणि मशिन नियंत्रण करण्यासाठी उपकरणे, सेंसर्स, तंत्रज्ञानाचा वापर, विविध औद्योगिक प्रक्रिया, यांत्रिकी प्रणालींचे ऑटोमेटेड नियंत्रण आणि अचूक calculation करण्यासाठीचे काम हे इंजिनिअर करतात.

Metallurgical Engineering- धातूंच्या उत्पादन, प्रक्रिया, धातूंच्या रासायनिक, भौतिक, आणि यांत्रिक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. तसेच धातूंच्या उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले जाते.

या नंतर आपण पाहणार आहोत नव्याने सुरु होणाऱ्या ब्रॅंचेस 

पहिली ब्रॅंच आहे..

Artificial Intelligence & Machine Learning- हे दोन अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत, जे computar science आणि डेटा सायन्सच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. AI आणि ML यांच्या एकत्रीकरणामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे. या कोर्समध्ये  UG आणि PG असे दोन्हीही पर्याय उपलब्ध असणार आहे. 

Al in Signal Processing- या मध्ये विविध प्रकारच्या सिग्नल्स, जसे की sound, image, व्हिडिओ किंवा इतर डिजिटल सिग्नल्स यांचा Analysis, Reform आणि conversion केले जाते. या क्षेत्रात देखिल मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते.

Al in Healthcare, Intelligent Communication System- कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात (AI) हे तंत्रज्ञान आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणार आहे. AI चा वापर डॉक्टर, वैद्यकीय तज्ञ आणि आरोग्य सेवक यांच्या कार्यास अधिक कार्यक्षम, अचूक आणि जलद बनविण्यासाठी केला जाणार आहे. AI च्या मदतीने आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांना नविन आणि सुधारित उपचार पद्धती, निदान आणि रुग्ण व्यवस्थापन यंत्रणा मिळणार असून आता हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना देखील शिकायला मिळणार आहे.  

या नवीन ब्रॅंच लवकरच COEP मध्ये सुरु होणार आहेत....

आणि हो अशाच नवनवीन शैक्षणिक विषयक माहिती आणि अपडेटस जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला जरूर फॉलो करा.