बारावी सायन्स नंतर आपल्यापैकी अनेकांना इंजिनिअरिंग करायचं असत.
त्यातच cet चा अभ्यास आणि अॅडमिशनची गडबड यात अनेक प्रश्न मनातच राहून जातात की खरंच आपण निवडलेल्या स्ट्रीमला भविष्यात किती स्कोप आहे?,
कॉलेज करत असताना नेमक्या काय काय अडचणी येतात, आणि आपल्याला कोणत्या चॅलेंजेस् ला फेस कराव लागेल हे असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतातच..
तर, आपण पाहुयात की 'इंजिनीअरिंग' ला प्रवेश घेण्याआधी नक्की काय तयारी केली पाहिजेल..
सर्वप्रथम, तुम्ही अशा व्यक्तीचा शोध घ्या ज्याने तुम्हाला हव्या असणाऱ्या स्ट्रीम मधून शिक्षण पूर्ण करून सध्या तो त्या क्षेत्रात एक चांगला जॉब करत आहे.
यामुळे तुम्हाला भविष्यात जॉबसाठी किती स्कोप मिळू शकतो हे तुम्हाला समजू शकते.
त्यानंतर, तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ज्या स्ट्रीम ला अॅडमिशन घ्यायच आहे त्या स्ट्रीमचे 2nd आणि 3rd year ला असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉलेज, कॅम्पस, प्रोफेसर आणि प्लेसमेंट यासर्व गोष्टींची माहिती बारकाईने जाणून घ्या..
यामुळेच तुम्हाला नेमक कोणत कॉलेज चांगल आहे हे समजण्यासाठी आधिकची मदत होईल.
यानंतर तुम्हाला ज्या ब्रांचला अॅडमिशन घ्यायचयं त्याच ब्रांचला शिकवणाऱ्या एखाद्या शिक्षकांची तुम्ही भेट घ्या यामुळे तुम्हाला तुमच्या संपूर्ण डिग्रीविषयी सविस्तर माहिती मिळेल.
याशिवाय ते तुम्हाला योग्य मार्गदर्शनही करतील..