logo
Back

असा करा स्मार्ट स्टडी

Home / असा करा स्मार्ट स्टडी


blog

असा करा स्मार्ट स्टडी


तुम्हाला तुमचा तो मित्र आठवतोय का जो अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करतो आणि चांगले मार्क्स देखील मिळवतो.. 

आपल्याला हा एकच प्रश्न पडतो की तो अभ्यास नेमका करतो तरी कसा.

याच उत्तर मी तुम्हाला देतो

सध्या सगळीकडेच एंट्रान्स किंवा फाईनल अशा वेगवेगळ्या परीक्षा सुरू आहेतच.. 

आता तुमचा अभ्यासही अंतिम टप्प्यात आला असेल, म्हणूनच या काही खास टिप्स, या सर्व टिप्स वापरुन तुम्ही स्मार्ट स्टडी करू शकता.

सर्वप्रथम 80- 20 अशा स्वरूपात सिलाबल्स च विभाजन करा, ते कसं करायच तर मागील 3-4 वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिका पहा आणि त्यातून असे टॉपीक शोधा की जे पुन्हा पुन्हा रिपीट झालेल आहे.. यासर्व प्रश्नांवरून तुम्हाला समजेल की कोणते टॉपीक, किती महत्वाचे आहेत ते.. 

त्यानंतर,

कोणत्याही विषयाचा सलग दोन तासापेक्षा जास्त अभ्यास करू नका, कारण यामुळे तुम्हाला कंटाळा येईल आणि तुम्ही केलेला अभ्यास हा तुमच्या लक्षात राहणार नाही.   

सर्वात शेवटची आणि महत्वाची टिप्स

ज्यावेळी तुम्ही शेवटच्या टप्प्यातील रिव्हीजन कराल, त्यावेळी एक रफ नोटबूक तुमच्याजवळ असुदयात जेणेकरून तुम्ही जे नोट्स मधून वाचाल ते तुम्ही लगेचच नोटबूक मध्ये लिहून ठेऊ शकता. यामुळे केलेला अभ्यास हा जास्त दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल.

या सर्व गोष्टी जरूर लक्षात ठेवा, यामुळे तुमचा परीक्षेतील स्कोर 100% वाढेल..